ऑलम्पिक विजेता कुस्तीपटू सुशिल कुमार ‘wanted’, खून प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर झाला फरार

ऑलम्पिक विजेता कुस्तीपटू सुशिल कुमार ‘वॉंटेड’, 

खून प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर झाला फरार देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार याच्यावर दिल्लीपोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.  त्यातच  सुशील कुमारदिल्ली कोर्टात पोलिसांच्या अटकेपासून सरंक्षण मिळावं म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र सुनावणीदरम्यान सुशीलचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस त्याला कधीही अटक करू शकतात.  दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या २३ वर्षीय सागर  धनखड  हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. सुशीलकुमार विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं असून त्याची माहिती देणाऱ्यासाठी एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. नवी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीत कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली आणि त्यात सुशील कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या घटनेनंतर सुशील कुमार फरार झाला आहे आणि पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सुशीलसह या घटनेतील दुसरा आरोपी अजय याच्यावरही ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post