सभापती अभिलाष घिगे आणि उपसभापती संतोष म्हस्के यांची २४ तास सेवा... कोविड केअर ठरतय रुग्णांना वरदान

 रामसत्य लान्स,वाळुंज येथील कोविड केअर ठरतय रुग्णांना वरदान......!कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य......!
सभापती अभिलाष घिगे आणि उपसभापती संतोष म्हस्के यांची २४ तास सेवा......!राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दादासाहेब दरेकर यांची राजकारण विरहित समाजसेवा......!


   नगर तालुक्यातील अनेक मोठी गावे असल्याने कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढले होते हीच गरज लक्षात घेता नगर बाजार समितीने रामसत्य लॉन्स,वाळुंज येथे कोविड केअर सेंटर सुरू केले,आज नगर तालुक्यात सर्व सोयी-सुविधा आणि मनाला आनंद देणारे कोविड सेंटर म्हणून त्याचा नावलौकिक होत आहे,. बाजार समिती सध्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात चांगले समाजोपयोगी कार्य करत आहे,त्याचाच एक भाग म्हणजे सभापती अभिलाष पाटील घिगे आणि उपसभापती संतोष म्हस्के यांनी बाजार समिती अंतर्गत कोविड सेंटर सुरू करुन तालुक्यात नि जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णांना सुद्धा प्रवेश दिला आहे.  घिगे पाटील आणि  म्हस्के २४ तास वेळ देऊन रुग्णांच्या सेवेकरिता कार्यतत्पर आहेत.आज कोरोनाच्या काळात घरचा नि जिवा-भावाचा माणूस साथ देत नाही,कोणी जवळ येत नाही,इतर वेळी कोणासही भेटण्यास पुढे असतात,पण कोरोनाचा रुग्ण माहिती झाला की त्याच्याशी संपर्कसुद्धा तोडला जातो,कारण संपर्क केला तर भेट घ्यावी लागेल त्यापेक्षा संपर्क केलेलाच नको!अशी परिस्थिती होऊन बसली आहे,अशा परिस्थितीत श्री.अभिलाष घिगे व श्री.संतोष म्हस्के कोविड सेंटरला रुग्णांना धीर देण्यासाठी सेवेत आहेत.

,प्रत्यक्ष रुग्णांची पाहणी केली असता त्यांना दिला जाणारा दररोजचा आहार,त्यांची घेतली जाणारी काळजी खरोखर उल्लेख करावी अशीच आहे याकामी त्यांना कै.दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक सहकार्य करत आहेत. शिवाजीराव कर्डीले यांचा जनसंपर्काच्या बाबतीत हातखंड मोठा आहे.नगर जिल्हयात बाजार समितिने सुरु केलेले हे पहिले कोविड केअर सेंटर आ.,रुग्णांना दररोज आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी योगासनांची विविध प्रात्यक्षिके केली जातात,रुग्णांची कोरोनाविषयी मानसिकता बदलवली जाते ही एक गोष्ट अभिमानाची आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते श्री.दादा दरेकर यांची राजकारणा पलीकडील समाजसेवा.
      नगर-श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष,शिराढोन गावचे सरपंच दादा दरेकर यांनी राजकारणाचा विचार न करता दररोज येथील कोविड रुग्णांची विचारपूस करणे,त्यांना मानसिक आधार देऊन घाबरुन न जाण्याचे आवाहन करणे अशी प्रेरणादायी मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत.सध्याच्या काळात राजकारण न करता कोरोनाच्या लोकांना आधार देणे गरजेचे आहे,इतर वेळी अनेक सुख-दुःखात सहभागी होणारी नेते मंडळी आता मात्र थोडी दुरावली गेली आहे,त्यांना लोकांनी सार्थ करुन दाखवलेला विश्वास याचा विसर पडू लागला आहे,आपण सर्वजण ही सृष्टीवरील लढाई एकोप्याने आणि एकजुटीने लढणार आहोत,भविष्यात आपापल्या पद्धतीने कोणीही कसेही राजकारण आणि समाजकारण करा पण सध्या कोरोना रुग्णांना आपलं मानायला कोणी तयार नाही याची खंत वाटते,एकमेकांवर टिका न करता एकमेकांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे असे ते आवर्जुन सांगतात.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post