शासकीय कर्मचार्यांसाठीच्या ५० लाख रुपये विमा कवच योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ

 शासकीय कर्मचार्यांसाठीच्या ५० लाख रुपये विमा कवच योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ
ग्रामसेवक युनियनच्या पाठपुराव्यास मोठं यश : एकनाथ ढाकणे
नगर: कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या शासकीय कर्मचा-यांना प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य लागू करण्याचे आदेश दि.२९ मे २०२० रोजी जारी झाले होते.   शासन निर्णयानुसार सदर आदेश दि.३० सप्टेंबर  २०२० पर्यंत लागू होते व नंतर त्यास
 दि.३१ डिसेंबर २०२०  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
होती. त्यानंतर घडलेल्या मृत्युची प्रकरणे वित्त विभागाच्या सहमतीने विशेष बाब म्हणून निकाली
काढली जात होती.  मात्र राज्यात मार्च २०२१ पासून करोनाची दुसरी लाट वेगाने पसरली. या पार्श्वभूमीवर विमा कवच योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने शासनाकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्याने आता राज्य सरकारने सदर योजनेस ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी झाला आहे. ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून कोविड मुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांच्या वारसांना या विमा कवचाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले. सदर विमा कवच संरक्षण १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीसाठी लागू असेल. कोविड मुळे मयत झालेल्या ग्रामसेवकांची विमा कवच योजनेची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली निघावी यासाठीही युनियन वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याचे एकनाथ ढाकणे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post