राज्यातील बिडी कामगारांना प्रोत्साहन भत्ता म्हणून रु. 5000/- भत्ता दयावा

राज्यातील बिडी कामगारांना प्रोत्साहन भत्ता म्हणून रु. 5000/- भत्ता दयावा प्रति, 

मा. कामगार मंत्री, 

दिलीप वळसे पाटील, 

महाराष्ट्र राज्य, मुंबई. 


     विषय :- नरेश कोटा यांच्या उपोषणास पाठिंबा व महाराष्ट्र       राज्यातील बिडी कामगारांना प्रोत्साहन भत्ता म्हणून रु. 5000/- भत्ता देणे बाबत. 


महोदय, 


        सध्या संपूर्ण जगात  कोरोना विषाणुचा प्रसार झालेला असून तो  रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याने  लॉकडाऊन केलेले आहे. या काळात विडी कामगारांच्या हाताचे काम थांबले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नगर शहर व जिल्ह्यातील हातावर पोट असलेल्या हजारो विडी कामगार आहेत त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी  राज्य शासनाने  प्रोत्साहन भत्ता दयावा या करीता श्रमिकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व स्त्री जन्माचे स्वागत चे प्रमुख नरेश कोटा हे उपोषणास बसले असून आज पाचवा दिवस आहे परंतु आता पर्यंत प्रशासनाने कोणतीही योग्य भूमिका घेतली नाही अगर मदत जाहीर केले नाही ही शोकांतिका असून प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.


     ज्या पद्धतीने तेलांगणा सरकारने बिडी कामगारांना प्रोत्साहन भत्ता जाहीर केले आहे त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने जाहीर करणे आवश्यक  आहे.  महाराष्ट्र  शासनानेही बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये भत्ता जाहीर केला आहे.  परंतु  राज्य सरकारकडून राज्यातील सुमारे दीड लाख विडी कामगार मात्र दुर्लक्षित झाले आहे. विडी कामगार हे हातावर पोट असलेले नागरिक असून त्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. लॉक डाऊनच्या काळात विडी उद्योग बंद झाला आहे. त्यामुळे विडी कामगार हाताला काम नसल्याने घरात बसून आहेत. या परिस्थितीत त्यांना आर्थिक सहाय्य मिळणे गरजेचे व आवश्यक आहे.


     तरी मे.साहेबांना नम्र विनंती की,  सध्य परिस्थिती चा सहानुभूती पूर्वक विचार करून विडी कामगारावर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन प्रत्येक बिडी कामगाराला प्रोत्साहन भत्ता रु. 5000/- जाहीर करावे व विडी कामगारांना न्याय द्यावा ही विनंती. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post