नगरकरांना जूनमध्ये पुरेशा प्रमाणात लसी मिळणार, आ.संग्राम जगताप यांचे विशेष प्रयत्न सुरु

नगरकरांना जूनमध्ये पुरेशा प्रमाणात लसी मिळणार, आ.संग्राम जगताप यांचे विशेष प्रयत्न सुरुनगर : कोरोनावरील लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेकजण लसीकरणापासून वंचित आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेऊन जूनमध्ये पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच आघाड्यांवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी लस खरेदी करण्याचीही तयारी करण्यात येत असून, याबाबत कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

आमदार जगताप म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. शहराची लोकसंख्या पाहता पाच लाखापर्यंत डोस उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु, त्या तुलनेत लस उपलब्ध होत नाही. सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे थेट कंपन्यांकडून लस खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेने लस खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केलेली आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. लसीकरणाचे काम पुढील तीन महिने चालणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मंगल कार्यालये भाडेतत्त्वावर घेऊन तिथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. पुरेशी लस उपलब्ध झाल्यास दिवसभर लसीकरणाचे काम चालेल. त्यामुळे केंद्रांवर गर्दी होणार नाही. सर्वांना लस मिळेल, असे नियोजन करण्यात येत आहे. येत्या जूनमध्ये मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे, असे जगताप म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post