केंद्र सरकारच्या ‘या’ धोरणामुळेच देशात लस टंचाई

केंद्र सरकारच्या धोरणामुळेच देशात लस टंचाई

 


पुणे  :  देशात 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याचं घोषित करण्यात आलं. मात्र, सध्या लशीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. कुठे अठरा वर्षावरील नागरिकांना लस मिळत नसल्याचं चित्र आहे. तर, कुठे 45वर्षावरील व्यक्तींनाही वाट पाहावी लागत आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी शुक्रवारी म्हटलं, की केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइन्सवर विचार न करताच 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली.

सुरेश जाधव म्हणाले, की भारतात किती लशी शिल्लक आहेत आणि आणि याबाबत आरोग्य संघटनेच्या काय गाइडलाइन्स आहेत, हे जाणून न घेताच सरकारनं अठरा वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली.आपण यातून मोठा धडा घेतला आहे. आपण एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. ते म्हणाले, की लसीकरण गरजेचं आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे, लोकांनी सावध राहायला हवं आणि कोरोनापासून बचावासाठी सर्व नियमांचं पालन करायला हवं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post