९० टक्के प्रभावी असलेल्या रशियन 'स्पुटनिक V' लसीची किंमत जाहीर

 

९० टक्के प्रभावी असलेल्या रशियन स्पुटनिक लसीची किंमत जाहीरनवी दिल्ली: रशियातून आलेल्या स्पुतनिक  या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसची किंमत 948 रुपये असेल. मात्र त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे लसीची किंमत 948 + 5 टक्के जीएसटी म्हणजे या लसीसाठी एकूण 995 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

रेड्डीज लॅबने या व्हॅक्सिनची सॉफ्ट लॉन्चिंग करताना शुक्रवारी हैदराबादमधील एका व्यक्तीला या लसीचा पहिला डोस दिला. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. तसेच या लसीला 13 मे रोजी सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरीने मंजुरी दिली आहे. या लसीची आणखी एक खेप आयात केली जाणार असून त्यानंतर या लसीची जूनपासून भारतातच निर्मिती केली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post