रूग्णसंख्या आटोक्यात...‘या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील


रूग्णसंख्या आटोक्यात...नाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील नाशिक  :  कोरोनाचा उद्रेक होत असल्याने राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 12 ते 23 मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन 23 मे च्या मध्यरात्री 12 वाजेनंतर अटी शिथिल करण्यात येणार आहे.  परंतु राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू  केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अधीन राहून सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post