1 जूननंतर राज्यात निर्बंध शिथील होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा मोठा खुलासा

1 जूननंतर राज्यात निर्बंध शिथील होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा मोठा खुलासा मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. '१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील,' अशी माहिती टोपे यांनी दिल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post