केंद्राचा मोठा निर्णय! कोविड रुग्णालयात दाखल होण्यासाठी आता कोरोना चाचणी बंधनकारक नसणार.

 केंद्राचा मोठा निर्णय!कोविड रुग्णालयात दाखल होण्यासाठी आता कोरोना चाचणी बंधनकारक नसणार.नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही. संशयित व्यक्तिलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करण्यात येणार आहे

नव्या नियमांनुसार रुग्ण कोणत्याही शहरात राहणारा असला तरी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणाने सेवा देण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही समावेश आहे. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयात केवळ वैध ओळखपत्रं नाही म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. आवश्यकतेनुसार त्याला रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, असं नव्या नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post