शिक्षक व शिक्षकेतरांना 50 लाखाचे विमाकवच लागू करण्याची मागणी

 कोरोना काळात कार्यरत शिक्षक व शिक्षकेतरांना 50 लाखाचे विमाकवच लागू करण्याची मागणी

कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या शिक्षकास तहसिलदाराकडून मारहाण प्रकरणाचा निषेधअहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना काळात कार्यरत असणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 50 लाखाचे विमाकवच लागू करावे व पाथरी (जि. परभणी) येथे चेक पोस्टवर कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकास शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या तहसिलदारास बडतर्फ करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. कोरोनाकाळात सेवा देणार्‍या शिक्षकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यातील शिक्षकांना दि.2 मे पासून 14 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. मात्र काही शिक्षकांना सुट्टी अगोदरपासूनच कोरोनाच्या वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या पोलीस व शासनाच्या इतर कर्मचार्‍यांसाठी शासनाने 50 लाखांचे विमा सुरक्षा कवच लागू केलेले आहे. मात्र शिक्षकांना यामधून वगळण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post