तपोवन रस्त्याच्या कामात विरोधकांनी खोडा आणला..पण आम्ही ठाम राहून काम मार्गी लावले

 दळणवळण व बाजारपेठेच्या दृष्टीने तपोवन रस्ता महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जाईल-आ.संग्राम जगतापतपोवन रस्त्याच्या चालू असलेल्या अंतिम कामाची पाहणी अहमदनगर प्रतिनिधी - शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असताना दळनवळणाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे यासाठी राज्य सरकार कडून औरंगाबाद महामार्ग ते मनमाड महामार्गांना जोडणारा तपोवन रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये विविध अडचणी आल्या होत्या आज मात्र या रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.तपोवनरस्ता हा भविष्यकाळातील दळणवळणाच्या व बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जाईल,या भागांमध्ये नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांना मूलभूत प्रश्नापासून सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत, कोरोना संकट काळात शासनाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही नगर शहर विकासासाठी शासनाकडून मोठा निधी प्राप्त करत आहोत. विकास कामांबरोबरच आरोग्य सुविधेकडे लक्ष केंद्रित केले असून, आरोग्याचा प्रश्नही मार्गी लावले जातील.विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या पाठपुराव्यामुळे उपनगरात विविध विकास कामे सुरू आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

      तपोवन रस्त्याच्या अंतिम डांबरीकरण कामाची पाहणी करताना आ.संग्राम जगताप, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर,नगरसेवक विनित पाऊलबुधे,नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,निखिल वारे,नगरसेवक सुनील त्रिंबके,सा.कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर,बाळासाहेब पवार,युवराज चव्हाण, सतिष ढवण,स्वप्नील ढवण,किसन कजबे,राहुल काजबे, प्रशांत निमसे,गणेश कसबे आदी उपस्थित होते.

        यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले की,तपोवन रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी आ.संग्राम जगताप यांनी पाठपुरवठा करून या रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला. विरोधकांनी या रस्त्याचे काम होऊ नये यासाठी विविध अडचणी निर्माण केल्या परंतु आम्ही मार्ग काढत या रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहेत.या भागातील तपोवन रस्ता हा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जात आहे. ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याचे काम पुन्हा नव्याने सुरू करून दर्जेदार करून घेतले आहे. आपल्यासमोर आता आरोग्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. यासाठी आ.संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून उपनगरांमध्ये सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post