"स्वाध्याय" उपक्रमास स्थगिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश

 "स्वाध्याय" उपक्रमास स्थगिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश



 ःमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता १ते ९ वी साठी १५ मे पासून राबवण्यात येणा-या स्वाध्याय उपक्रमास स्थगिती देण्यात आली आहे.या निर्णयाचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बस्वदे, सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी स्वागत केले.

आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने १४ मे रोजी विद्या प्राधिकरणाला पत्र देवून गेली वर्षभर विद्यार्थी या कठीण परिस्थितीत आँफलाइन व आँनलाइन अध्ययन केले आहे व उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना बौध्दिक विश्रांतीची गरज असून शिक्षकही सध्या कोरोना संबधी विविध कामे करत आहेत . या अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांवर पडणार असल्याचे म्हटले होते.तसेच घराघरात अनेक रुग्ण असतांना या भयग्रस्त वातावरणात कोणतंही शैक्षणिक वातावरण नसतांना हा उपक्रम उन्हाळी सुट्टीत राबवण्याचा अट्टाहास का? हा प्रश्न उपस्थित केला होता.

  शाळा सुरु झाल्यानंतर या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी व सर्व विद्यार्थ्यांना छापील स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करुन देण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली होती.

एकुण सध्याची परिस्थिती पाहून व स्वाध्याय उपक्रमास मिळणारा कमी प्रतिसाद लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे यांचे कडून उपक्रम सध्या स्थगित करण्यात येत असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे  शिक्षक नेते , सर्जेराव राऊत , राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, सरचिटणीस सुनिल शिंदे, कार्याध्यक्ष शरद वांढेकर रामप्रसाद आव्हाड,  प्रदिप चक्रनारायण , विष्णू चौधरी , संजय शेळके, शिवाजी ढाकणे,तालुकाध्यक्ष जर्नादन काळे, पांडुरंग देवकर , बुथेवल हिवाळे ,सुधिर बोऱ्हाडे ,बाळासाहेब जाधव , सुरेश नवले , लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, संदिप भालेराव , भारत शिरसाठ, विलास लवांडे, दत्तागय परहर, शहाजी जरे, ज्ञानदेव कराड ,संजय सोनवणे, प्रताप कदम , राजाराम वने ,रविंद्र अनाप, दत्तात्रय बर्गे, प्रकाश पटेकर, सुखदेव डेंगळे, ज्ञानदेव उगले, शिवाजी माने, सभाजी तूपेरे रामराव ढाकणे, राजकुमार शहाणे, प्रविण शेळके, बाबासाहेब डोंगरे ,संजय कांबळे, विष्णुपंत बांगर, , संदीप शेळके यांनी समाधान व्यकत केले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post