सोनाराचा खून करणारे आरोपी अखेर अटकेत !

 सोनाराचा खून करणारे आरोपी अखेर अटकेत !



अहमदनगर- शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे आढळून आलेला मृत्यूदेह हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार (ता.पाटोदा) येथील सोनाराचा असल्याचे समोर आले असून, गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा  खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर मृत्यूदेह  भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 


याबाबत शिरूरकासार (जि.बीड) चे पोलीस निरिक्षक सिध्दार्थ माने यांनी माहिती दिली आहे की, शिरुरकासार (जि. बीड) येथील सोनार विशाल सुुभाष कुलथे (वय २५) याचा गुन्हा रजि. ६३ / २०२१ कलम ३६५ भादवि ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. ही घटना गुरुवार (दि.२०) घडली. खब-यामार्फत माहिती मिळाल्यानंतर चौकशी केली असता शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असून याच दुकानात सोनाराचा खून करण्यात आला. या घटनेनंतर त्याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला. ते ठिकाण दाखविण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post