सावेडीतील ‘हा’ परिसर 13 मेपर्यंत कंटेन्मेंट झोन


सावेडीतील सिद्धीविनायक कॉलनी व परिसर 13 मेपर्यंत कंटेन्मेंट झोननगर :  गेल्या काही दिवसांतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून सावेडीतील सिद्धीविनायक कॉलनी व परिसरात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला. महापालिकेने या संदर्भातील आदेश काढले आहेत. हा परिसर अत्यावश्यक सेवा वगळता 13 मे पर्यंत पुर्णतः बंद करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना परिसराबाहेर जाण्यास आणि बाहेरील नागरिकांना या परिसरात येण्यास पुर्णतः मज्जाव करण्यात येणार आहे. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला. नोकरीनिमित्त या भागातील नागरिकांना बाहेर जाणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापनाने कंटेन्मेंटची मुदत संपेपर्यंत संबंधित लोकांची नोकरीच्या ठिकाणीच राहण्याची सुविधा करावी, असेही आदेशात म्हटले आहे. आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post