आज अनिल राठोड असते तर सर्वसामान्य नगरकर चिंतेत नसता.....

 


आज अनिल राठोड असते तर सर्वसामान्य नगरकर चिंतेत नसता.....नगर : नगर महानगरपालिकेने शहरात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावून किराणा, भाजीपाला विक्रीही बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयाचे नगरकरांमध्ये तीव्र पडसाद उमटत असून शिवसेनेने आपल्या शिवसेना नगर या फेसबुक पेजवर महानगरपालिकेच्या निर्णयावर कडक टिका केली आहे. स्व.अनिलभैय्या राठोड यांची आठवण काढत अनेकांनी आज राठोड असते तर सर्वसामान्य नगरकर चिंतेत नसता अशी भावना व्यक्त केली आहे. मनपाच्या तुघलकी निर्णयाविरोधात राठोड यांनी आवाज उठवत नगरकरांना दिलासा दिला असता अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली आहे. या फेसबुक पेजवर अनिल राठोड यांच्या विचारांप्रमाणे प्रशासनाविरोधात लढण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post