मा.शरदचंद्रजी पवार कोविड आरोग्य मंदिरास भाऊसाहेब शिंदे यांची आर्थिक मदत..!

 मा.शरदचंद्रजी पवार कोविड आरोग्य मंदिरास भाऊसाहेब शिंदे यांची आर्थिक मदत..!


भाळवणी, तालुका पारनेर या ठिकाणी मा.आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नांतून १००० बेडचे 'मा.शरदचंद्र पवार कोविड आरोग्य मंदिर' साकारले आहे. आरोग्य मंदिरात आदर्श व अविरत रुग्णांची सेवा होत आहे.हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.हे पाहून वडगाव सावताळ गावचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी आर्थिक मदतीचा धनादेश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांच्या शुभहस्ते तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्याकडे सुपूर्द केला . याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे उर्जा राज्यमंत्री मा.नामदार प्राजक्त तनपुरे तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके हे देखील उपस्थित होते.


                     यापूर्वी देखील पहिल्या लॉक डाऊनच्या काळात भाऊसाहेब शिंदे यांनी पळसपुर, पोखरी ,ढगेवाडी, कर्जुले हर्या ,वासुंदे ,वडगाव सावताळ ,खडकवाडी, ढोकी, गाजदीपूर या गावांमध्ये पाचशेच्या वर कुटुंबांना जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप केले. तसेच दीपावलीमध्ये देखील शेकडो वंचित परिवारातील माता-भगिनींना साडी-चोळीची भाऊबीज दिली आहे. दिपावली गोड व्हावी म्हणून किराणा वाटप केले आहे. भविष्यात देखील गोरगरीब जनतेला मदत करण्याचा,त्यांचे अश्रू पुसण्याचा मनोदय भाऊसाहेब शिंदे यांनी व्यक्त केला आहे.


                समाजामध्ये खरोखर अशा सेवाभावी व्यक्तींची गरज आहे.जे दीन-दु:खीतांच्या संकटात धावून जातील. त्यांचे दुःख हलके करण्याचा मनोभावे प्रयत्न करतील.

अशा व्यक्ती या गरजू लोकांसाठी नक्कीच एक आशेचा किरण बनून समाजासमोर येतील!!


            आर्थिक मदत दिल्याबद्दल तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके साहेब,  बाळासाहेब खिलारी गुरुजी, दत्तात्रय निवडूंगे,डॉक्टर उदय  बर्वे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी शेठ तरटे यांनी भाऊसाहेब शिंदे यांचे आभार मानले आहेत.!!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post