सरपंच परिषद नोंदणी ऍपचे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 सरपंच परिषद नोंदणी ऍपचे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकार्पणनगर : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र नोंदणी ऍपचे गुरुवारी (दि. २७ ) दुपारी हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी दिली.

कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडक राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकासातील तज्ञ व्यक्ती, ग्रामस्थ आदींना सहभागी होता येणार आहे. याप्रसंगी राज्य परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात मोठया संख्येने फेसबुक लाईव्ह सहभागी होण्याचे आवाहन उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष राणीताई पाटील, उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात, कोअर कमिटी प्रमुख अविनाश आव्हाड, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू पोतनीस, शिवाजी आप्पा मोरे, किसन जाधव, पांडुरंग नागरगोजे, आनंद जाधव, सुधीर पठाडे, सुप्रिया जेथे, नारायण वनवे, आदींनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post