सकारात्मक.... जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे चांगले प्रमाण कायम

 दिनांक ०५ मे, २०२१

आज ३१०३ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ४४७५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९१ टक्के
अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३१०३ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ३५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५ हजार ११४ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०५३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३८५ आणि अँटीजेन चाचणीत १०३७ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९, अकोले १३५, जामखेड ११५, कर्जत १०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ४१, नेवासा ११, पारनेर ४६, पाथर्डी ७०, राहता २७, राहुरी ०७, संगमनेर १४९, शेवगाव १२०, श्रीगोंदा १०२, श्रीरामपूर ४०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि इतर जिल्हा ०९ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५७६, अकोले ६१, जामखेड १२, कर्जत २२, कोपरगाव १११, नगर ग्रामीण ३६६, नेवासा १२४,  पारनेर ११०, पाथर्डी ३४, राहाता २१८,  राहुरी ९६, संगमनेर २१६, शेवगाव २७, श्रीगोंदा ५२, श्रीरामपूर २३०, कॅंटोन्मेंट बोर्ड ३० आणि इतर जिल्हा ९० आणि इतर राज्य १० अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १०३७ जण बाधित आढळुन आले. मनपा १३१, अकोले ०८,  जामखेड ०३, कर्जत १२१, कोपरगाव १२५, नगर ग्रामीण ६१, नेवासा २१, पारनेर १३०,  पाथर्डी ४०,  राहाता ३६, राहुरी ११६, संगमनेर २१, शेवगाव ०५, श्रीगोंदा १४६, श्रीरामपूर १३,  कॅंटोन्मेंट ५३ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ५८१, अकोले ४६, जामखेड १०९, कर्जत १२९,  कोपरगाव १२३, नगर ग्रामीण २४३, नेवासा ९४, पारनेर २९९, पाथर्डी १७४, राहाता ३०४, राहुरी १७७, संगमनेर २३९,  शेवगाव २०३,  श्रीगोंदा १८८,  श्रीरामपूर १०८, कॅन्टोन्मेंट ५४, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि  इतर जिल्हा २०  अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:१,६६,३५५


उपचार सुरू असलेले रूग्ण:२५११४


मृत्यू:२१७३


एकूण रूग्ण संख्या:१,९३,६४२


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post