खा.डॉ.सुजय विखेंनी साधला करोना रूग्णांशी संवाद

 

खा.डॉ.सुजय विखेंनी साधला करोना रूग्णांशी संवादआ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोव्हीड केअर सेंटरमध्ये खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी रुग्ण ,डाॅक्टर आणि नर्सिंग स्टाफशी संवाद साधला.    रोज रात्री रुग्णांना लोणी येथील युवा उद्योजक ॠषिकेश तांबे, लक्ष्मीकांत असावा, सिध्दांत मिसाळ ,भूषण विखे ,गणेश खेंडके यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या हळदीच्या दुधाचे वितरण खासदार डॉ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.बाभळेश्वर येथील राजेंद्र हिरालाल गदीया व निलेश गदीया यांनी ११हजार रुपयांया मदतीचा धनादेश खा.डॉ विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.लक्ष्मणराव नेहे यांच्या तर्फे अकराशे अकराशे अंडी रुग्णांसाठी देण्यात आली.याप्रसंगी प स माजी उपसभापती बबलू म्हस्के ,आशितोष नेहे,संकेत नेहे, डॉ किरण आहेर,डॉ निलेश पारखे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post