कृषी उत्पन्न बाजार समिती कडून' या' कोविड सेन्टर ला तब्बल १०लाख रु चा धनादेश

 प्रवरा कोविड सेन्टर साठी समाजाचे पाठबळ.   


        

      राहाता  कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कडून प्रवरा कोविड सेन्टर ला आर्थिक मदत म्हणून तब्बल १०लाख रु चा धनादेश  सभापती भाऊसाहेब जेजुरकर ,उपसभापती बाळासाहेब जपे, सचिव उद्धव देवकर व सर्व संचालक यांनी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे सुपूर्त केला.

            पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी स्वनिधीतून प्रवरा कोव्हीड केअर सेंटरला ५५हजार ५५५ रूपयांचा मदतीचा धनादेश आ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे सुपूर्द केला.

                

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ,गणेश विद्या प्रसारक मंडळ आणि गणेश विद्या प्रसारक मंडळातील सेवकांच्या पतसंस्थेने एकूण १लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.      प्रवरा कोव्हीड सेंटर मधील रुग्णांच्या उपचारा करीता विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे पाटील आणि डॉ रोहन खर्डे पाटील  यांनी दोन आॅक्सिजन काॅन्सट्रेटर,दाढ येथील महात्मा फुले विद्यालयातील माजी विद्यार्थ्यानी १५० वेपोरायझर स्टिमर आ.विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केले.


कोल्हार येथील डाॅ.सुजयदादा विखे युनायटेड फ्रंन्ट यांच्या वतीने अंडी व बिस्लरी पाणी ,लोणी खुर्द येथील  छत्रपती शासन यांच्या वतीने बिस्किटांचे बाॅक्स आणि रविंद्र दिघे विजय नालकर यांनी पाण्याच्या बाटल्यांचे बाॅक्स उपलब्ध करून दिले.      प्रवरा कोव्हीड केअर सेंटरमधीर रुग्णांच्या उपचाराकरीता कोल्‍हार येथील मार्केट कमिटीमधील व्‍यापा-यांनी ४५ हजार रुपये, कोल्‍हार भगवतीपूर देवालय ट्रस्‍टच्‍यावतीने ६१ हजार, प्रा.प्रकाश रावसाहेब विखे आणि परिवाराच्‍या वतीने ५१ हजार, सयाजी रघुनाथ खर्डे २१ हजार, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडु ११ हजार, गणेश कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन प्रतापराव जगताप २१ हजार, सहकारी संस्‍थांचे सहाय्यक उपनिबंधक जितेंद्र शेळके ११ हजार, किसनराव विखे आणि परिवाराच्‍या वतीने २० हजार, डॉ.प्रशांत गोंदकर आणि डॉ.स्‍वाधीन गाडेकर २१ हजार, डॉ.श्रीकांत बेद्रे व प्रमोद बेद्रे २१ हजार, स्‍व.भास्‍कर आप्‍पा दिघे यांच्‍या स्‍मरणार्थ राहुल दिघे यांनी २१ हजार रुपये,  डॉ.संजय कहार ११ हजार, रविराज संजय आहेर व प्रशांत संजय आहेर ५ हजार, दुर्गापूर चे आनंद कन्स्ट्रक्शन चे विठ्ठल पुलाटे यांनी ११हजार १११ रु ,आप्‍पासाहेब चोळके यांनी २१०० रुपयांच्‍या मदतीचा धनादेश आ.राधाकृष्‍ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍याकडे सुपूर्त केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post