प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये 90 ऑक्सिजन बेडची सुविधा कार्यान्वीत

 प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये 90 ऑक्सिजन बेडची सुविधा कार्यान्वीतनगर : लोणी येथे सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णहित लक्षात घेता ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या स्वतंत्र विभागाची सुरुवात करण्यात आली. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने ही सुविधा सुरू करण्यात आली असून यामुळे रुग्णांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील आदी उपस्थित होते. 90 ऑक्सिजन बेडच्या सुविधेने सुसज्ज असलेले हे एकमेव प्रवरा कोव्हीड केअर सेंटर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post