लाॅकडाउन काळात दिव्यांग कर्मचारींना कार्यालय उपस्थितीत सुट - प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेला यश

 लाॅकडाउन काळात दिव्यांग कर्मचारींना कार्यालय उपस्थितीत सुट - प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेला यश  प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनेने कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता व दिव्यांग कर्मचारींची रोगप्रतिकारक शक्ती इतरांच्या तुलनेत कमी असते म्हणून मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री मा.श्री.धनंजय मुंडे, मा. राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे प्रेरणास्थान आदरणीय श्री. बच्चू कडू  यांना निवेदन सादर केले होते, सदर निवेदनाची दखल घेत आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई यांनी कोरोना चा वाढता प्रसार पाहता दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सुट व वर्क फ्राॅम होम चे आदेश सर्व कार्यालयांना दिले आहेत .त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेंस्टिंग, उपचार व लसीकरण मध्ये प्राधान्य देण्याबाबत ही शासनाने आदेश दिले आहेत या निर्णयामुळे राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांनी प्रहार संघटनेचे धडाडीचे राज्याध्यक्ष श्री. रविंद्र सोनवणे, राज्य सचिव श्रीम. भक्ती भंडारी , राज्य सदस्य श्री. विवेक पाटील व सर्व राज्य पदाधिकारींचे कौतुक केले. 

      जेव्हा जेव्हा दिव्यांग कर्मचारींवर अन्याय,अपमानास्पद वागणूक, दुजाभाव केला जाईल तेव्हा तेव्हा प्रहार दिव्यांग शासकीय- निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना मुंबई ११ चे सर्व पदाधिकारी दिव्यांग कर्मचारींच्या पाठीशी भक्कम उभे राहतील व दिव्यांग कर्मचारींना त्यांचे हक्क ,न्याय मिळवून देतील, असे प्रतिपादन संघटनेचे युवा राज्याध्यक्ष श्री. रविंद्र सोनवणे यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री.बाळासाहेब चव्हाण, जिल्हा सचिव श्री.भाऊसाहेब लाड, ढोकणे भाऊसाहेब, गणेश दळवी  ,शंकर आगलावे , भाऊसाहेब भोजणे, रुपेश वाणी, सुनील अभियेकर,वैशाली यादव मॅडम जिल्हा महिला प्रमुख. या सर्वां कडून राज्य कार्यकारिणीचे खूप खूप आभार व्यक्त करण्यात आलेले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post