प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेतून महिन्याला 3500 रुपये !....समोर आला मोठा खुलासा

प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेतून महिन्याला 3500 रुपये मिळणार !....समोर आला मोठा खुलासा

 


मुंबई : सध्या देशात एकिकडे कोरोनाचं थैमान सुरु आहे.या काळात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच सोशल मीडियावर ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. यात देशातील 10 वी पास असलेल्या सर्व बेरोजगारांना दरमहिन्याला 3 हजार 500 रुपये देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आधीच अडचणीत आलेले अनेक लोक या मेसेजमधील वेबसाईटवर जाऊन आपली खासगी माहिती भरत आहेत 

व्हॉट्सअॅपवर हा मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. मात्र, हा मेसेज आणि ही योजन खरी की खोटी याचा यात विचार होताना दिसत नाहीये. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (PIB) या व्हायरल पोस्टची दखल घेत केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केली नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच व्हायरल होत असलेला मेसेज खोटा (Fake Message) असल्याचं सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post