पाथर्डीत कडकडीत लॉकडाऊन, पोलिसांचे शहरातून संचलन

पाथर्डीत कडकडीत लॉकडाऊन, पोलिसांचे शहरातून संचलनपाथर्डी :जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च काढून प्रशासनाने शक्ती प्रदर्शन केले आहे. या काळात सर्वांनीच घरात राहा सुरक्षित राहा असा संदेश देण्यात आला आहे. वाढत्या कोरोना बधितांची आकडेवारी लक्षात घेता आज दि 6 में पासून तालुक्यात जनता कर्फ्यू लागू झाला आहे.शहरात व तालुक्यतील कायदा सुव्यवस्था शांततेत राहावी यासाठी शहरातून प्रशासनाने संचलन करून शक्ती प्रदर्शन केले आहे.कडकडीत बंद पाळण्यासाठी शासनाने गांभीर्याने घेतले आहे. 

रूट मार्च वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण,तहसिलदार शाम वाडकर,नायब तहसिलदार पंकज नेवसे,नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गटविकास अधिकारी शितल खिंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील,पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे,नगरसेवक महेश बोरुडे,नामदेव लबडे, अनिल बोरुडे,रमेश हंडाळ,बबन बुचकूल यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले होते.

तालुक्यात १० दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला.याकाळात फक्त हॉस्पिटल, मेडिकल चालू राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post