पाथर्डी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर सुरु

 पाथर्डी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटर सुरु
पाथर्डी:-अमोल भैय्या गर्जे मित्र मंडळाच्या वतीने शहरातील शेवगाव रोडवर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.याचे उद्घाटने प्रांताधिकरी देवदंत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण  मुंढे,तहसीलदार शाम वाडकर,आरोग्य अधिकारी डॉ भगवानराव दराडे यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपचे तालुकाउपाध्यक्ष गोकुळ दौंड,शिवसेना नेते भगवानराव दराडे,येळीचे सरपंच संजय भाऊ बडे,नायब तहसीलदार नेवसे ,नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर ,भाजपा युवा मोर्चाचे मुकुंद गर्जे,पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण,नगरसेवक बंडुशेट बोरुडे,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सीताराम बोरुडे,भाजपा शहरअध्यक्ष अजय भंडारी ,अर्जुन धायतडक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी तहसिलदार शाम वाडकर म्हणाले,कोरोना काळात चांगली संकल्पना घेऊन उत्तम दर्जाची सोया सुविधा कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मिळतील.प्रशासनाकडून हवी ती मदत केली जाईल.डॉक्टर ,इतर आरोग्य कर्मचारी आणि औषध गोळ्या तुम्हाला आरोग्य विभागाकडून दिल्या जातील अशी ग्वाही यावेळी वाडकर यांनी दिली . या कोविड केअर सेंटर मध्ये सुरवातीला पन्नास रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. टप्पा टप्पाने तीनशे कोरोना बधितांना प्राथमिक औषध उपचार मिळणार आहे. रुग्णांना वाचण्यासाठी याठिकाणी पुस्तके उपलब्ध करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रमात भागवत कथा,कीर्तन ,प्रवचन, प्राणायाम ,योगा आदी कार्यक्रम आयोजित केली जाणार असल्याची माहिती अमोल गर्जे यांनी दिली आहे.उपस्थितांचे आभार नितीन गटाणी यांनी मानले . 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post