“हे म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं आहे”, गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा!

 

“हे म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं आहे”, 

गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा!मागासवर्ग पदोन्नतीच्या मुद्द्यावरून नव्यानं विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर आणि विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका करताना थेट मेंढरू आणि लांडग्याचं उदाहरण दिलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

मागासवर्ग पदोन्नतीच्या उपसमितीचं अध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यावरून पडळकरांनी टीका केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी आहे का? तर तान्ह्या बाळालाही विचारलं तर तेही सांगेल की हे जातीयवादी आहेत. मागासवर्गाचं दु:ख ज्या प्रतिनिधीला माहिती आहे, अशा व्यक्तीला या उपसमितीचं अध्यक्ष केलं असतं, तर समाजाला योग्य न्याय मिळाला असता. पण अजित पवार मागासवर्गीय पदोन्नतीच्या उपसमितीचे अध्यक्ष होणं म्हणजे मेंढरांचं नेतृत्व लांडग्यानं करावं आणि मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी असं आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post