मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी होणार - आमदार बबनराव पाचपुते

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा सहभागी होणार !



मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून सहभागी होईल.ठाकरे सरकारने ही फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनांत भाजपचा सक्रीय सहभाग राहील. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही आमदार बबनराव पाचपुते  यांनी या पत्रकाद्वारे केला आहे. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post