माणुसकी हरवली....मयत करोनाबाधित महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी

माणुसकी हरवली....मयत करोनाबाधित महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी अमरावती : येथील कोविड रुग्णालयात  उपचार घेत असताना कोरोनामुळे एका महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत महिलेच्या गळ्यातील 7 ग्रॅम सोन्याची 22 हजार रुपयांची पोत कुणीतरी चोरली. मृत महिलेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. 22) अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. बडनेरा नजीकच्या अंजनगावबारी येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी तीन मे रोजी येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना 19 मे रोजी त्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी महिलेच्या अंगावरील दागिने दिसले नाही. मृत महिलेच्या नातेवाइकांनी यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. त्यानंतर गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post