"समान काम समान वेतना''साठी परिचारिका रस्त्यावर, पोलिसांनी घेतले ताब्यात

समान काम समान वेतनासाठी परिचारिका रस्त्यावर, पोलिसांनी घेतले ताब्यात साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व परिचारक यांनी संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जागतिक परिचारिका दिनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या कंत्राटी आरोग्य सेवकांचे काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानकडे साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय व साईनाथ रुग्णालय असे दोन स्वतंत्र रुग्णालय आहेत. या दोन्ही रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून आरोग्य सेवेत असलेल्या इंसोर्स व आउटसोर्स परिचारक व परिचारिका यांनी आज (१२) मे रोजी जागतिक परिचारिका दिनी आपल्या विविध मागण्यांसाठी साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय समोर कामबंद आंदोलन केले. 'संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे किंवा आरोग्य सेवेतील कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान ४४ हजार ९०० रुपये वेतन द्यावे,' अशी मागणी त्यांनी केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post