करोनाला रोखण्यासाठी निंबळक गावाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...

 निंबळक येथे सात दिवस कडक लॉकडाऊननगर : -  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णसंख्येत होणारी वाढ व मुत्यूचे वाढलेले प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी निंबळक  ग्रामपंचायतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे .वैद्यकिय सेवा, दुध डेअरी वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे  अशी माहिती निंबळक सरपंच प्रिंयका लामखडे  यांनी दिली. लेखी आदेशची प्रत तहसील कार्यालयात जमा केली आहे.

 निंबळक,( ता.नगर ) येथील लोकसंख्या मोठया प्रमाणात आहे. या भागातील ऐंशी टक्के नागरिक, महिला  नोकरी निमित्त एमआयडीसी येथील कारखान्यात  कामाला जात आहे. एमआयडीसी येथे परीसरातील गावे,  नगर शहरातून जवळपास पंचवीस ते तीस हजार कामगार कामाला येतात. यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. एप्रिल महिन्यात निंबळक  येथे कोरोना रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.मुत्यूचे प्रमाण ही वाढले आहे. या भागात कोरोना रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोना सामिती व ग्रामपंचायत ने बारा तारखेपर्यत कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे. दवाखाने , मेडिकल चोवीस तास, दुध डेअरी सकाळी दोन तास चालू राहणार आहे . बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहे . या बाबत लेखी आदेश ही काढलेला आहे. या लॉक डाऊन साठी प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज आहे तरच लॉक डाऊन यशस्वी  होईल .एमआयडीसी येथील पोलीस प्रशासनाने दोन तीन वेळेस पेट्रोलिंग करावी . विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर योग्य कार्यवाही करावी दंड करावा . तसेच नागरिकानी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये स्वतःची काळजी द्यावी,कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ विलगीकरण कक्षात किंवा कोवीड सेंटर ला जाऊन उपचार घ्यावे असे अवाहन सरपंच प्रिंयका लामखडे यांनी केले आहे .लॉक डाऊनचे नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे हि लामखडे  यांनी सांगीतले.


उदयोजकांनी कोवीड सेंटर सुरू करावे

कोरोनामुळे ग्रामीण भागातील ना गरिकाना शहरातील रुग्णालयामध्ये उपचार घेणे परवडणारे नाही .एमआयडीसी येथे जवळपास एक हजार कारखाने आहे . त्यामुळे उद्योजकांनी पुढाकार घेऊन निंबळक येथे शंभर बेडचे कोवीड सेंटर उभाररुन वैद्यकिय मदत करावी  .गरजुना आधार घ्यावा . असे आवाहन निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे . - अजय लामखडे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post