निंबळक येथे लोकसहभागातून उभारले कोवीड सेंटर

  निंबळक येथे लोकसहभागातून उभारले कोवीड सेंटर



 नगर - निंबळक ( ता. नगर ) येथे कोवीड रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कोरोनामुळे येथे पंचवीस ते तीस  कुंटुबातील प्रमुख व्यक्तिला जीव गमवावा लागला आहे .  एखादया कुंटुबाच्या घरात कोरोना रुग्ण आढळला तर नगर मध्ये उपचारा करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकाची हाल होत आहे .ऑक्सीजन बेडही उपलब्ध होत नाही . गावातील नागरिकासाठी मोफत  कोवीड सेंटर सुरू करण्यासाठी येथील युवा उद्योजक दादा साठे, युवा नेतृत्व केतन लामखडे, गावातील वैद्यकिय डॉक्टर,  राजकीय ,सामाजिक,  शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, व सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी  गावातील राजकारण मतभेद विसरून गावातील जनतेसाठी  पुढाकार घेऊन डॉ. अजय गायकवाड यांच्या मंगल कार्यालयामध्ये ५० बेडचे  कोवीड सेंटर सुरू केले.  इसळक,  निंबळक, खारेकर्जुने येथील कोरोना रुग्णासाठी येथे सोय केली . गावातील तरुणांनी गावासाठी पुढाकार घेऊन कोवीड सेंटर सुरू झाल्याचे समजतात गावामधून मदतीचा ओघ सुरू झाला . गावातील ग्रामस्थांनी आपल्या पारिस्थितीनुसार मदत करण्यास सुरवात केली सध्या तेरा रुग्ण येथे उपचार घेत आहे. रोज सकाळी योगा घेतला जातो.  सकाळी नाष्ट्याला अंडी,  दुपार संध्याकाळी जेवण दिले जाते . लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेमधून रुग्णाच्या उपचारासाठी औषधे विकत घेऊन दिली जाते . गावामध्ये सहा रुग्णालये आहेत. प्रत्येक रूग्णालयातील डॉक्टर या रुग्णाची तपासणी दर तीन तासांनी करत आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी घरात न थांबता या सेंटर मध्ये येऊन उपचार घ्यावे असे अवाहन निंबळक सरपंच प्रियंका लामखडे , इसळक सरपंच छाया गेंरगे, यांनी केले आहे. प्रशासनाने यांची दखल घेऊन या सेंटर साठी औषधोपचाराची मदत करावी अशी मागणी अजय लामखडे यांनी केली .

या सेंटर रुग्णाची देखभाल रविंद्र पवार, इकबाल पटेल, दादा झावरे, बापु  कोतकर, अजिक्य कदम, हरीश कळसे, चंदू कोतकर, कानिफनाथ कोतकर, संतोष मगर, मयूर झोडगे, अजय कोतकर,अविनाश टकले, कैलास सासवडे दिवस रात्र करत आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post