निंबळक येथे लसीकरणाचे डोस वाढवावे - लामखडे

 निंबळक येथे लसीकरणाचे डोस वाढवावे - लामखडेनिंबळक : -  लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निंबळक येथे अतिशय कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे . येथील लसीकरणाचे डोस वाढविण्यात यावे या बाबतचे निवेदन अजय लामखडे व उपसरपंच बाळासाहेब कोतकर  यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे दिले .

 निबळक( ता. नगर ) येथील लोकसंख्या पंधरा हजारच्या आसपास आहे . लसीकरण चालू झाल्यापासून निंबळक गावाला अवधे तिनशे पन्नास डोस मिळाले आहे . येथे कोरोना रूग्णाची संख्या मोठया प्रमाणात आहे .कोरोनामुळे  पंचवीस ते तीस नागरिक ना जीव गमवावा लागला आहे . गावाजवळ असणाऱ्या एमआयडीसी मध्ये येथील नागरिक कामाला जात  आहे बहुतेक एमआयडीसी येथील कामगार भाडेतत्वावर राहत आहेत .एमआयडीसी येथील उद्योगधंदे चालू आहे शहरातून तसेच बाहेर गावामधन एमआयडिसी येणाऱ्या कामगार वर्गाची संख्या जास्त असल्यामुळे एकमेंकाबरोबर संपर्क येत आहे . यामुळे कोरोनाचा फैलाव मोठया प्रमाणात होत आहे . यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यास जास्तीत जास्त नागरिक लस देणे अत्यंत गरजेचे आहे. तरी जेणेकरून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यु संख्या कमी होण्यास मदत होईल तरी आपल्या कार्यालयाकडून निंबळक ला जास्तीत जास्त लसीकरण होण्यास संबंधित कार्यालय यांना निर्देश देन्यात यावे.

चौकट- ८४ दिवस पुर्ण झालेल्या नागरिकाना दुसरा डोस दिला जाणार आहे . यामुळे लस आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या नियोजनानुसार गावनिहाय पुन्हा पहिला डोस दिले जाणार असल्याचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगीतले .

फोटो - निंबळक येथे लसीकरणाचे डोस वाढवून मिळावे या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना देताना अजय लामखडे , बाळासाहेब कोतकर .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post