नगर तालुक्यातील तीन ठिकाणी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर कारवाई

तीन ठिकाणी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर कारवाई, 1 लाख 7 हजार रूपयांची गावठी दारू व रसायन जप्त नगर - तालुक्यातील नेप्ती शिवारात तीन ठिकाणी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख सात हजार रूपयांची गावठी दारू व रसायन जप्त करण्यात आले. यासंदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


याबाबत पहिली फिर्याद पोना. अशोक मच्छिंद्र मरकड यांनी दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाल्यानुसार कारवाई करण्यात आली. यातील आरोपी सुनील बाजीराव पवार (रा. नेप्ती, अहमदनगर) फरार असून 30 हजार रूपयांची गावठ दारू व रसायन नष्ट करण्यात आले. दुसरी फिर्याद पोना. राहुल नारायण शिंदे यांनी दिली आहे. 


शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेंद्र छबुराव चौगुले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चौगुले त्याच्या राहत्या घराच्या अडोशाला दारू विक्री करत होता. पोलिसांनी तेथील 34 हजार रूपयांची दारू व रसायन नष्ट केले असून आरोपी फरार आहे. तिसरी फिर्याद पोना. योगेश भास्कर ठाणगे यांनी दिली असून आरोपी ईश्वर तुळशीराम चौगुले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ईश्वर चौगुले त्याच्या घराच्या अडोशाला दारूची विक्री करत होता. आरोपी फरार असून पोलिसांनी तेथील 43 हजार रूपयांची दारू व रसायन नष्ट केले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक राऊत, सफौ. पठाण, हेकॉ. शेख, पोना. ठाणगे, खेडकर, शिंदे, चालक पोहेकॉ. इथापे आणि धुमाळ यांच्या पथकाने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post