‘या’ दिवशी 14 तासांसाठी NEFT मनी ट्रान्सफर सर्व्हिस बंद

 

23 मे रोजी 14 तासांसाठी NEFT मनी ट्रान्सफर सर्व्हिस बंदनवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकने एनईएफटी (NEFT) बाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. RBI  नं दिलेल्या सुचनेनुसार, एनईएफटीची सेवा 23 मे 2021 रोजी रात्री 12 वाजून एक मिनिटांपासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. आरबीआयचं म्हणणं आहे की, एनईएफटीची प्रोसेस आणखी सुलभ करण्याच्या उद्देशानं एका दिवसासाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेनं एक पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली. त्याचसोबत यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. RBI ने म्हटलं की, NEFT सर्व्हिसची सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केलं जात आहे. हे अपग्रेडेशन 22 मे 2021 रोजीचं काम बंद झाल्यानंतर केलं जाईल. त्यामुळे 22 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी 23 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत NEFT सर्व्हिस उपलब्ध नसणार आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post