नवजीवन व कमिन्सचे योगदान प्रेरणादायी - प्रा.डॉ.विजय म्हस्के

 नवजीवन व कमिन्सचे योगदान प्रेरणादायी.- प्रा.डॉ.विजय म्हस्के

 

  अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रकोप झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना  कमिन्स इंडिया फौंडेशन व नवजीवन संस्थेचे मोफत अन्नदानाचे योगदान जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत अन्नदान वाटप प्रसंगी प्रा.डॉ.विजय म्हस्के यांनी व्यक्त केले.
    कोरोना संसर्गाच्या महामारीमध्ये ग्रामीण भागातून अनेक रुग्ण शहरातील विविध हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती होतात. परंतु त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक, तसेच परप्रांतातील कामगार यांच्या जेवणाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कमिन्स इंडिया फौंडेशन यांचे आर्थिक सहाय्याने नवजीवन प्रतिष्ठाणने गरजूंना मोफत अन्नदान वाटपाचा कार्यक्रम अविरत चालू ठेऊन गरजूंना मदत केली आहे असे त्यांनी सांगितले. 
याप्रसंगी नवजीवनचे अमोल खंडागळे, संदीप शिंदे, संगीता पवार, जयंत पाठक आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post