जिल्हाधिकारी, आयुक्तांना पगार बंद करून लॉकडाऊन करा, कडक निर्बंधांविरोधात मनसे आक्रमक

 जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा पगार बंद  करा व  नंतर लॉकडाऊन करा

मनसेच्या नितीन भुतारे यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन



अहमदनगर-  जिल्ह्यात तसेच शहरात ज्या प्रकारे लॉकडाऊन राबविला जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक छोटे मोठे व्यावसायिक वैतागले असून दोन महिने होत आले फक्त लॉकडाऊन कडक पध्दतीने राबविला जात आहे. लोकांच्या बँकांचे हप्ते थांबत नाही आहे, दररोजचा खर्च थांबत नाही. त्यात संपूर्ण कडक पद्धतीने लॉकडाऊन लावून सामान्य नागरिकांचा छळ प्रशासनाकडून सूरू आहे. कुठल्याही प्रकारची मदत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना केली नाही. सर्वसामान्यांना बँक खात्यात पैसे जमा केले नाही सरकार चे अपयश झाकण्यासाठी लोकांवर कोरोना आजाराची जबाबदारी टाकून लॉकडाऊन वाढविण्याच्या घोषणा करत आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यात व शहरात दररोज एक एक आदेश जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त काढत आहेत. त्यातून कडक निर्बंध लादले त्यातून आधीच सर्वसामान्य नागरिकांकडे पैसे नसतांना हजारो रूपये दंड करून लोकांचे खिसे रिकामे करण्याचे काम जिल्हा व महानगरपालिका प्रशासन करत आहेत. 

 जिल्हाधिकारी व आयुकत यांना शासनाचा पगार चालु असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल समजत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा जसा आर्थिक पुरवठा आपण लॉकडाऊन लाऊन बंद  केला तसाच जिल्हाधिकारी व आयुक्त तसेच यांच्या बरोबर असणारे सर्व अधिकारी यांचे पगार लॉकडाऊन काळात बंद  करावे. अशी मागणी मनसेच नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन केली केली आहे. 

तसेच लवकरात लवकर सर्व अहमदनगर जिल्हा व शहरांतील बाजारपेठा छोटे मोठे दुकाने उघडावित. खुप दिवस झालेत लॉकडाऊन मुळे बंध असलेला व्यापार पूर्वपदावर आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती देखील नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे. रूग्णांची संख्या दिवसेदिवस कमी होत चालली आहे त्यामुळे कडक निर्बंध लावणे योग्य नाही.लवकरात लवकर लॉकडाऊन उठवला नाही तर मनसेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक यांना बरोबर घेउन रस्त्यावर आंदोलनं करू व या आंदोलनात व्यापाऱ्यांनी छोटे मोठे व्यावसायिक लोकांनी सुध्दा सामील व्हावे असे आवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post