बेगडी समाजकारण दाखवून आ.निलेश लंके जनतेची फसवणूक करतायत : सुमित वर्मा

 बेगडी समाजकारण दाखवून आ.निलेश लंके जनतेची फसवणूक करतायत : सुमित वर्मानगर : पारनेरचे मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी दैठणे गुंजाळ गावातील आरोग्य यंत्रणेबाबत  आवाज उठवल्यानंतर त्यांना आ.निलेश लंके यांनी फोनवर चुकीची भाषा वापरली. याबाबतची ऑडिओ क्लिपही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. या प्रकारामुळे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी आ.लंके यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेगडी समाजकारण दाखवून आ.निलेश लंके जनतेची फसवणूक करीत आहेत, अशी टिका वर्मा यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केली आहे. 

वर्मा यांनी म्हटले आहे की, आरोग्य मंदिराच्या नावाखाली जे कोविड सेंटर पारनेरचे आमदार निलेश लंके चालवत आहे, तिथे सगळी शासकीय आरोग्य यंत्रणा कार्यान्वीत आहे. शासकीय मदतीने स्वतःचा बडेजाव करण्याचा प्रयत्न आ.लंके करीत आहेत. पारनेर तालुक्यातील दैठणेगुंजाळ गावातील आरोग्य यंत्रणा पुर्णपणे ठप्प झाली होती. त्या ठिकाणच्या रूग्णांना कोणतीही आरोग्य सुविधा मिळत नसल्याने मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सर्व शासकीय आरोग्य अधिकारी व डॉक्टर यांना धारेवर धरले. नंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. पण आमदार निलेश लंके यांनी ठेवलेल्या एका खाजगी डॉक्टराने अविनाश पवार यांना याबाबत विचारपूस करत लगेच आ.लंके यांना फोन दिला.  त्यांना माहीत झाले की समोर बोलणारा व्यक्ती हा मनसेचा पदाधिकारी आहे. तेव्हा ते पवारांशी खालच्या भाषेत फोनवर बोलले.

याप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अविनाश पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. एखाद्याने काही मदतीसाठी पुढे आला तर त्याला हात देणं गरजेचं आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण राष्ट्रवादीचे आमदार अशा पद्धतीने वागत असतील तर मग ते देवदूत असो नाहीतर कोणीपण असो आमच्या नजरेत अशा लोकांना काही किंमत नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही हे आमदारांच्या लक्षात राहीलेले नाही. आम्ही सध्या या वातावरणात फक्त लोकांसाठी काम करण्यात धन्यता मानतो आणि तो आमच्या राज साहेबांचा आदेश आहे. या निवेदनात मार्फत आ.लंके यांना एक आवाहन करू इच्छितो की, आज राजकारण करण्याची वेळ नव्हे आणि आपल्याकडून किंवा आपल्या सहकार्‍यांकडून सुद्धा हे होता कामा नये, आपण जर लोकांसाठी काम करत आहात तर आपण सर्व समावेशक कार्य केले पाहिजे, असे वर्मा यांनी म्हटलं आहे.

1/Post a Comment/Comments

  1. आरोग्य सेवेचे राजकारण योग्य नाही

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post