मनपा जम्बो ऑक्सीजन कोविड सेंटरचा विषय अखेर पुढे सरकला...

 मनपा जम्बो ऑक्सीजन कोविड सेंटरचा विषय अखेर पुढे सरकला...

आयुक्त, महापौर, काँग्रेस शिष्टमंडळाची पार पडली बैठक प्रतिनिधी : शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारण्याची मागणी दोन आठवड्यांपूर्वी प्रशासनाच्या जिल्हा आढावा बैठकीत महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोर केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशावरून आज जुन्या महानगरपालिकेमध्ये आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. 

यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, क्रीडा सचिव मच्छिंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. 

काँग्रेसने जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटरची मागणी लावून धरली आहे. यासाठी काँग्रेसने आज तिसऱ्यांदा मनपा आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने १००० ऑक्सीजन बेडची उभारणी करा असे काँग्रेसचे म्हणणे आहे. आज या संदर्भामध्ये महानगरपालिके मध्ये झालेल्या चर्चेमध्ये काँग्रेसने अत्यंत आक्रमकपणे शहरातील नागरिकांची बाजू मांडली. 

यावेळी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा पाहून आयुक्त शंकर गोरे यांनी या संदर्भामध्ये तातडीने बजेट तयार केले जाईल. सदर बजेट हे महापालिकेच्या सभागृहामध्ये मान्यतेसाठी ठेवले जाईल व त्यास मान्यता घेऊन उभारणी केली जाईल असे आश्वासन काँग्रेसला दिले. 

सदर बजेटला महानगरपालिका सभागृहाने तात्काळ मान्यता द्यावी असा मुद्दा यावेळी किरण काळे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समोर मांडला. वाकळे यांनी महानगरपालिकेकडे मर्यादित यंत्रणा आहे असे सांगितले. तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे संदर्भामध्ये अडचणी आहेत असा मुद्दा उपस्थित केला. काळे यांनी त्यातून आपण राजकीय जोडे बाजूला ठेवत एकत्रितपणे सर्व मिळून मार्ग काढून असे महापौर यांना सांगितले. त्यानंतर महापौरांनी प्रशासना कडून प्रस्ताव आल्या नंतर आम्ही त्यास मान्यता देऊ, तसेच जागेसाठी मी देखील पाहणी करेल असे आश्वासन यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाला दिले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post