गोरगरीबांच्या जेवणासाठी कॉंग्रेसच्या "या'' महिला आमदार स्वत: घरी बनवतात पोळ्या

गोरगरीबांच्या जेवणासाठी आ.प्रणिती शिंदे स्वत: बनवतात पोळ्या

 


सोलापूर : कोरोनाच्या  कठीण काळात काँग्रेसतर्फे एका स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 'मदतीचा एक घास' या उपक्रमाअंतर्गत लॉकडाऊनच्या काळात सोलापूर शहरातील गरीब, बेघर, झोपडपट्टीत राहणारे गरजू आणि रस्त्यावर भाकरीसाठी वणवण फिरणारे भिक्षूक यांच्यासाठी जेवणाची सोय काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. 

प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी रोजचे जेवण बनत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून अधिकच्या 10 ते 15 पोळी तसेच काही भाजी बनवायची, अशी संकल्पना प्रणिती शिंदे यांनी मांडली होती. यामध्ये स्वत: पुढाकार घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वत: देखील पोळ्या लाटल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वत: पोळ्या तयार करुन आपल्या घरापासून उपक्रमाची सुरुवात केल्याने कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी होत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post