कर्तव्य बजावणार्‍या पोलिसास मारहाण, दोघांना अटक

 


कर्तव्य बजावणार्‍या पोलिसास मारहाण, दोघांना अटकनगर : एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यास कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अनिल पांडुरंग आव्हाड असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे.  सोमवार दि. 17 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आव्हाड हे कोविड 19 विषाणू रोगाच्या अनुषंगाने बोल्हेगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांविरूद्ध कारवाई करत होते. त्यावेळी आरोपी दादाभाऊ फ्रान्सीस वंजारे (वय 31, रा. वडगाव, गुप्ता, अहमदनगर) आणि कैलास साळवे हे दोघे दुचाकी (डीएन 09 ए 7371) वरून डबल सीट आले असता त्यांना आव्हाड यांनी दंड भरण्यास सांगितला. दंड भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपी साळवे हा फिर्यादी आव्हाड यांना शिवीगाळ करून तेथून पळून गेला. त्यानंतर आरोपी वंजारे याला दंड भरण्यास सांगितले असता वंजारे याने आव्हाड यांची गचांडी पकडून चापटीने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून कामकाज बंद पाडले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी दादाभाऊ वंजारे याला लगेच ताब्यात घेतले तर आरोपी साळवे याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post