अ.नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १०९वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा ३० मे ला होणार

 अ.नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १०९वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा ३० मे ला होणार

पतसंस्था सभासदांसाठी राबवणार कन्यादान व सूनमुख योजना- अध्यक्ष बाबासाहेब मुदगल


वार्षिक सर्वसाधारण अहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ संचालक बाळासाहेब गंगेकर यांच्या हस्ते संपन्न


अहमदनगर प्रतिनिधी- अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना कळवण्यात येते की, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने कलम १४४ व संसर्ग प्रादुर्भाव व प्रसार कलम१८८ लागू केले असल्यामुळे अशा परिस्थितीत समक्ष सर्वसाधारण वार्षिक सभा घेणे शक्य नसल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वार रविवार, दिनांक ३०मे रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन झूम ॲप द्वारे होणार आहे, या सभेमध्ये सभासदांच्या हितासाठी तातडीने कर्ज पंधरा हजारा वरून वीस हजार होणार आहे,मयत निधी पाच हजारांवरून दहा हजार करण्यात येणार आहे. सभासदाला दिली जाणारी वैद्यकीय मदती बरोबर सभासदाच्या वैवाहिक जोडीदारास पंचवीस हजारा पर्यत दिली जाणार आहे. याच बरोबर मुला मुलीचे लग्न समारंभासाठी पतसंस्था कन्यादान व सूनमुख योजना राबवणार आहे. सभासदांसाठी बचत योजना म्हणून, पोस्टाच्या धर्तीवर आवर्ती (RD) सुरू करणार आहे. तसेच विविध विषय यासभेपुढे ठेवली जाणार आहे तरी सभासदांनी ऑनलाइन झूम ॲप द्वारे सभेस उपस्थित राहावे अशी विनंती पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी केले आहे.

          अहमदनगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ संचालक बाबासाहेब गंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल,व्हाईस चेअरमन विकास गीते, संचालक सतीश ताठे, संचालक किशोर कानडे, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post