पद्मशाली भुषण विठ्ठलराव मंगलारम कालवश

 पद्मशाली भुषण विठ्ठलराव मंगलारम कालवशनगर - पद्मशाली भुषण विठ्ठलराव मंगलारम सर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षाचे होते. 
त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, मुली, बहीणी, नातु, पणतू, असा मोठा परिवार आहे .
स्व. विठ्ठलराव मंगलारम सर हे मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर मंगलारम व शिक्षण क्षेत्रातील एकनाथ व गोपाळ मंगलारम यांचे वडिल होत. नगरला मार्कंडेय विद्यालय निघाल्यावर तत्कालीन समाज धुरिणांच्या आग्रहाखातर ते हेडमास्टर ची नोकरी सोडून मार्कंडेय हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून जॉईन झाले. नगरला पद्मशाली सेवा मंडळाच्या मार्फत त्यांनी सामुदायिक विवाह,गुणवंत विद्यार्थी गौरव,विडी कामगार व विणकर यांचे प्रश्‍न सोडवणे, व्यसनमुक्ती, शिक्षण प्रसार, रोजगार मार्गदर्शन आदी उपक्रम राबवले. त्यांच्या जाण्याने समाजातील न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतीक्रीया अनेकांनी व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली. श्री.मंगलारम सर  आणि त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांनी डॉ. नाथ पाऊलबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली पद्मशाली समाजातील विडी कामगारांसाठी नित्यसेवा घरकुल संकुलाची निर्मिती केली.तेथेच  नित्यसेवा संस्थे तर्फे प्राथमिक, माध्यमिक शाळा व डी एड कॉलेज चालवले जाते. सर अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही करत असे, ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांचे संबंध होते त्याठिकाणी कित्येक वर्षापासून आज पर्यंत दहावीत प्रथम व द्वितीय येणार्‍या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करत असत. सर शेवटच्या क्षणापर्यंत समाजसेवा करीत राहिले. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post