राज्यातील लॉकडाऊन वाढवला; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

 राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय



मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील. 

तसेच राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव काहीही होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post