देशी दारुच्या ठराविक मात्रेने करोना बरा होतो, शेवगावमधील डॉक्टरच्या दाव्याची सोशल मिडियावर चर्चा

देशी दारुच्या ठराविक मात्रेने करोना बरा होतो, 

शेवगावमधील डॉक्टरच्या दाव्याची सोशल मिडियावर चर्चा शेवगाव : दारू हा कोरोनावरील उपाय आहे. दारूच्या सहाय्याने पन्नासहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे केल्याचा दावा बोधेगाव येथील एका डॉक्टरने केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतची एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोमवारी सोशल मीडियावर बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांच्या नावाने एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘दारूचा काढा’ कोरोना बाधितांना दिल्यास रुग्ण बरा होतो. तसेच याला पुष्टी देताना काही रुग्णांना आलेला अनुभव त्या व्हायरल पाेस्टमध्ये कथन करण्यात आला आहे. याचबरोबर दारूची मात्रा कशी उपयुक्त ठरते हे समजून सांगण्यासाठी काही संशोधनाचा दाखलाही देण्यात आला आहे. 


मी दारूचे समर्थन करत नाही, परंतु आजपर्यंत बेड न मिळालेल्या ५० कोरोनाबाधित रुग्णांना त्या आधारे बरे केले आहे. आजही काही उपचार घेत आहेत. यामध्ये माझ्या अनुभवानुसार सत्यता आढळून आली असून पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकतो.

-डॉ. अरुण भिसे,

बोधेगाव

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post