कोरोनाच्‍या तिस-या लाटेला ताकदीनिशी परतवून लावू

 जय आनंद फौंडेशन व मनपा संचलित आयुर्वेद कॉलेज येथे ऑक्‍सीजन सुविधा असलेले नविन आय सी यु सुरू


कोरोनाच्‍या तिस-या लाटेला ताकदीनिशी परतवून लावू  मा.आ.श्री;संग्रामभैय्या जगताप 


नगर -  गेल्‍या 1 वर्षापासून मानवी जीवनावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे. या कोवीडच्‍या संकट काळामध्‍ये नगर शहरातील सामाजिक संस्‍था, दानशूर व्‍यक्‍ती, मनपा प्रशासन यांनी महत्‍वाची भूमिका पार पाडली आहे. वर्षभरापासून शहरातील डॉक्‍टर्स ,आरोग्‍य सेवक, मनपाची आरोग्‍य यंत्रणा, कोवीड सेंटर चालविणा-या खाजगी व्‍यक्‍ती, संस्‍था यांनी कोरोना रूग्‍णांवर उपचारासाठी प्रयत्‍नाची परकाष्‍ठा केली अनेकांचे प्राण वाचविले. काही दुर्देवी घटना सोडता नगर शहरातील नागरिकांनी कोरोनाला आत्‍मविश्‍वासाने पराभूत केले. आजूनही नगरकर शासनाने निर्बंध पाळत असल्‍यामुळे गेल्‍या काही दिवसापासून कोरोना रूग्‍णांच्‍या संख्‍येमध्‍ये लक्षणीय घट होत आहे. संशोधकांच्‍या भाकीतानुसार देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून या काळात कोरोना रूग्‍णांना ऑक्‍सीजनची कमतरता पडू नये यासाठी ऑक्‍सीजन सुविधा असलेले आयसीयू सेंटर सुरू केले आहे. कोरोनाच्‍या या तिस-या लाटेला आपण सर्व भक्‍कमपणे ,आत्‍मविश्‍वासाने परतवून लावू.  असे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभेय्या जगताप यांनी केले.


       गंगाधर शास्‍त्री गुणे आयुर्वेद कॉलेज येथे जय आनंद फौडेशनच्‍या विशेष सहयोगातून व मनपा संचलीत ऑक्सिजन सुविधा असलेले नविन आयसीयु विभागाचा शुभारंभ उदयोजक मा.श्री.नरेंद्र फिरोदिया यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला.  यावेळी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप, मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे, आयुक्‍त मा.श्री.शंकर गोरे, उदयोजक मा.श्री.नरेंद्र बाफना, उदयोजक मा.श्री.राजेश कटारिया, नगरसेवक मा.श्री.विपुल शेटीया, मा.श्री.कमलेश भंडारी, मा.श्री.रितेश पारख, मा.डॉ.श्री.पियुश मराठे, उपायुक्‍त मा.श्री.यशवंत डांगे, आरोग्‍याधिकारी डॉ.श्री‑अनिल बोरगे, सीए मा.श्री.किरण भंडारी, मा.श्री.संदेश कटारिया, मा.श्री.अशोक गुगळे, मा.श्री.पोपट भंडारी, मा.श्री.वसंत बोरा, मा.श्री.मयुर शेटीया, मा.श्री.निलेश गुगळे, मा.श्री.विशाल झंवर, मा.श्री.वैभव गुगळे, मा.श्री.शाम भुतडा, मा.श्री.अनुद सोनीमंडलेचा मा.श्री.गौरव बोरा, मा.श्री वैभव मेहेर, मा.श्री.महावीर बोरा, मा.श्री.गौतम गुथा आदी उपस्थित होते.


      मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप पुढे म्‍हणाले की, उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांनी मानवतेच्‍या भावनेतून गेली एक वर्ष सामाजिक बांधिलकी जोपासत बुथ हॉस्‍पीटल येथे कोरोना रूग्‍णांना मोफत जेवण देण्‍याचे काम करित आहे. तसेच प्‍लाझमा निर्मिती मशिन रक्‍तपेढीला भेट दिली. आदीसह विविध कामासाठी नेहमीच ते मदत करित असतात. तज्ञांच्‍या इशारा नुसार कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. या लाटेला थांबविण्‍यासाठी पूर्व तयारी करणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेद महाविद्यालय येथे जय आनंद फौडेशनच्‍या विशेष सहयोगातून व मनपा संचलीत ऑक्सिजन सुविधा असलेले नविन आयसीयु विभागाचा शुभारंभ केला आहे. लवकरच या ठिकाणी हवेतून ऑक्‍सीजन निर्मितीचा प्‍लॅट सुरू होणार आहे. आपण केलेल्‍या कामाच्‍या माध्‍यमातून जनतेचा विश्‍वास संपादन केलेला आहे. नगर शहरात कधीही केलेल्‍या कामाची फोटोबाजी होत नाही पण प्रत्‍यक्षात काम करून दाखविले जाते. कोरोनाच्‍या संकट काळामध्‍ये आरोग्‍य यंत्रणा कमी पडत असताना या आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये जीव वाचविणे व मानसिक आधार देण्‍याचे काम केले आहे.  कोरोनाची लढाई जिंकण्‍यासाठी सर्वांच्‍या सहकार्याची खरी गरज आहे असे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केले­ आहे.


      यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, कोरोना संकट काळामध्‍ये मनपाने मानवता हाच धर्म समजून वर्षभर मोठे काम केले आहे. काही जन मनपाला  नांवे ठेवण्‍याचे काम करतात. त्‍याने नांवे ठेवून निगेटिव्‍ह बोलण्‍यापेक्षा चांगल्‍या कामाकडे पहावे आम्‍ही चांगले काम उभे केले आहे. या वेदना देणा-या काळामध्‍ये प्रत्‍येकाने आपली भूमिका पार पाडावी. मनपाने कधीही दुजाभाव न करता जिल्‍हयातील कोरोना रूग्‍णांना मदतीचा हात दिला. बुथ हॉस्‍पीटल मधील सर्व कोरोना रूग्‍णांचे बील मनपाने 1 कोटी 90 लाख रूपये दिले असे ते म्‍हणाले.


      उदयोजक मा.श्री.नरेंद्र फिरोदिया म्‍हणाले की,मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी कोरोनाच्‍या संकट काळामध्‍ये आपली भुमिका यशस्‍वीपणे पार पाडली आहे. 1 वर्षा पासून आरोग्‍य सेवेत पुढे राहून कोरोना रूग्‍णांना मदतीचा हात देण्‍याचे काम केले आहे. कोरोनाच्‍या तिस-या लाटेसाठी प्रत्‍येकाने सतर्क राहण्‍याची गरज आहे. या लाटेमध्‍ये तज्ञांच्‍या सुचनेनुसार लहान मुलांवर परिणाम होणार आहे. तरी प्रत्‍येकाने मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. एकजुटीने मुकाबला करून कोरोनाची लढाई आत्‍मविश्‍वासाने जिंकायची आहे. सर्वांनी लसीकरण करून घेण्‍यासाठी पुढे यावे असे ते म्‍हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post