टाकळी खातगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्मान

टाकळी खातगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्माननिंबळक : - पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगाव ( ता. नगर ) येथे भेट दिली. कोविड 19 संदर्भात कामाची पाहणी व माहीती घेतली . येथील कर्मचाऱ्याचे कोवीड काळात सुरु असलेल्या कामाचे कौतुक करून  येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच आरोग्य केंद्रातील कोविड तपासणी व लसीकरण सत्राची माहीती घेतली. कोविडची लक्षणे असणारे रुगणाची तपासणी करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश  महाजन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व सत्कार केला. मागील वर्षापासून महाजन यांनी आरोग्य केंद्रात चांगल्या प्रकारे सेवा दिल्याबद्द्ल उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी त्याचा  सन्मान केला . याप्रसंगी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका पवार, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post