संतापजनक....डिस्चार्ज देताना 11 हजारांसाठी हॉस्पिटलने रूग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र घेतले

संतापजनक....डिस्चार्ज देताना 11 हजारांसाठी हॉस्पिटलने रूग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र घेतले

 


बुलडाणा : बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे. बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत 11 हजार रुपये किंवा मंगळसूत्र देत नाही तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही, अशी तंबी देखील या रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. अखेर रुग्णाच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र काढून रुग्णालय प्रशासनाला द्यावं लागलं 

संबंधित घटनेवर रुग्णाच्या मोठ्या भावाने नाराजी व्यक्त केली आहे. भावाच्या उपचारासाठी त्याच्या पत्नीने कानातील दागिने गहान ठेवले होते. खरंतर त्या दागिन्यांची किंमत 28 हजार रुपये इतकी होती. मात्र, वेळ वाईट असल्याने समोरच्याने फक्त 23 हजार दिले. रुग्णालयात भावाच्या आता डिस्चार्ज मिळणार होता. रुग्णालय प्रशासनाने हिशोब केला. त्या हिशोबत आमच्याकडे 11 हजार रुपये कमी पडत होते. तर रुग्णालय प्रशासनाने ते पैशे दिल्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रच मागितलं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post