केडगाव केंद्रातील शिक्षकांतर्फे कोव्हिड सेंटरला किराणा

 केडगाव केंद्रातील शिक्षकांतर्फे कोव्हिड सेंटरला किराणा वाटपअहमदनगर: - केडगाव मध्ये काही दिवसांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख मा. दिलीप सातपुते यांनी कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. तसेच डॉन बॉस्को येथेही कोव्हिड सेंटर आहे. केडगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्रा. शिक्षकांतर्फे केंद्रप्रमुख दिलीप दहिफळे सर, संतोष गवळी सर व सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे सर यांच्या पुढाकारातून केंद्रातील शिक्षकांनी व महिला शिक्षीकांनी काही मदत जमा केली. त्यातून त्यांनी या कोव्हिड सेंटरला किराणा मदत आज देण्यात आली. यावेळी मा. दिलीप सातपुते, मनीष ठुबे, सुनील ठुबे, पारुनाथ ढोकळे सर हे उपस्थित होते. तसेच डॉन बॉस्को  व  अमरधाम मधील कर्मचाऱ्यांना  स्वतंत्रपणे  किराण्याचे  किट  देण्यात आले. यावेळी दिलीप सातपुते म्हणाले की केडगाव केंद्रातील शिक्षकांनी सेंटरला किराणा देऊन महत्त्वाचे कार्य केले आहे. आतापर्यंत दोनशे पेशंट आपल्या सेंटर मधून बरे होऊन गेल्याचे दिलीप सातपुते यांनी सांगितले. अमरधाम मधील  कर्मचारी  फार महत्त्वाचे काम करतात - परंतु  ते  दुर्लक्षित घटक आहेत. म्हणून  केडगाव केंद्रातील  शिक्षकांमार्फत  त्यांना व अशा  इतरही कर्मचाऱ्यांना  मदत देण्यात आली. मदतीचा हा पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्प्यात मेडिकल संबंधित वस्तू देण्यात येणार आहेत. केडगाव विभागातील कर्मचाऱ्यांना फेस शील्ड मास्क व इतर वस्तू देण्यात येणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post