मुंबईच्या धर्तीवर नगर मध्ये देखील "ड्राईव्ह इन व्हॅक्सीनेशन" प्रक्रिया सुरू करावी

 मुंबईच्या धर्तीवर नगर मध्ये देखील "ड्राईव्ह इन व्हॅक्सीनेशन" प्रक्रिया सुरू करावी - दिपक कावळे पा. 

      सद्ध्या दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना रुग्णांचा आकडा आणि वाढते उन्हाचे तापमान पाहता आपल्या अहमदनगर महानगरपालिकेनी देखील मुंबई प्रमाणे ड्राईव्ह इन व्हॅक्सीनेशन हि प्रक्रिया सुरू करावी , कारण आपण पाहिले असेलच सध्या तापमान खूप वाढले आहे आणि अशा तापमानात 45+ च्या नागरिकांना , जेष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगांना रांगेत ताटकळत उभे न राहता सुलभ रीतीने लस घेता येईल आणि यामुळे  वाढत्या उन्हातमुळे काही अनुचित प्रकार होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही , त्याच प्रमाणे काही लसीकरण केंद्रांवर खूप सारी अनावश्यक गर्दी होऊन त्या गर्दीमुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती देखील निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्या महानगरपालिकेने  ड्राईव्ह इन व्हॅक्सीनेशन हि प्रक्रिया चालू केल्यास उन्हाच्या तडाख्यात लागणाऱ्या रांगा आणि होणारी गर्दी या कटकटीतून ज्येष्ठ नागरिक ,दिव्यांग आणि त्यांच्या सोबत  येणाऱ्या कुटुंबियांची हेळसांड खुप मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात न आल्याने सोशल डीस्टंसिंगचे पालन होऊन कोरोनाचा फैलाव थांबण्यास मदतच होईल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post